ड्रोन स्प्रे सेवा

    ड्रोन-स्प्रे-सेवा म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतातील पिकांवर कीटकनाशके, खते, आणि इतर आवश्यक द्रव्यांचे स्प्रे करणारी सेवा आहे. या सेवेत ड्रोनचा वापर करून अत्यंत कार्यक्षम आणि जलद गतीने मोठ्या शेतांवर स्प्रे करता येतो. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम वाचतो, तसेच स्प्रेची अचूकता वाढते. ड्रोन-स्प्रे-सेवेच्या मदतीने पिकांचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येते, उत्पादन वाढवता येते, आणि पर्यावरणाची हानी कमी होते. ही सेवा ग्रामीण भागात, मोठ्या शेतांमध्ये, आणि विविध पिकांसाठी उपयुक्त ठरते.

    फायदे

    पिकांचे सर्वेक्षण:
    कृषी ड्रोनच्या मदतीने शेतकरी त्यांच्या पिकांचे सर्वेक्षण करू शकतात. सॅटेलाईट मदतीने हाइपरमल्टी स्पेक्ट्रम कॅमेराच्या माध्यमातून पिकांची स्थिती, जमीन गुणवत्ता आणि रोग-कीटकांचा प्रभावाचा आढावा घेऊ शकतात.

    वेळेची बचत:
    ड्रोनच्या मदतीने शेतीची विविध कामे वेगाने आणि कमी वेळात पूर्ण करता येतात.

    अचूकता:
    ड्रोनच्या तंत्रज्ञानामुळे पिकांचे सर्वेक्षण व फवारणी अत्यंत अचूकतेने करता येते.

    कमी खर्च:
    मजूर खर्च कमी होऊन शेतीची उत्पादकता वाढवता येते.

    रोग व कीटक नियंत्रण:
    पिकांच्या रोग व कीटकांचा त्वरित आढावा घेऊन योग्य ती फवारणी करून कीड नियंत्रणात आणता येते.

    फायदे

    1. ड्रोन 5 मिनिटांत एक एकर फवारणी करू शकतो. उसाच्या शेतात, एका दिवसात 20 एकरांपर्यंत फवारणी करता येते. कमी उंचीच्या पिकामध्ये एकाच दिवसात 30 एकरांपर्यंत फवारणी करता येते.

    2. ड्रोन फवारणी करताना प्रति एकर फक्त 10 लिटर पाणी वापरले जाते.

    3. शेतकरी घातक रसायनांच्या संपर्कात येण्यापासून वाचतात. शेतीमध्ये ड्रोन वापरण्याचा हा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे.

    4. शेतकरी कीटकनाशके आणि कृषी रसायनांच्या खर्चात 30% पर्यंत बचत करू शकतात. ड्रोन ग्रेड खतांचा वापर करून बचत 60% पर्यंत वाढू शकते.

    5. ड्रोनद्वारे पिकाच्या पानांच्या पुढील व मागील बाजूस फवारणी केली जाते.

    शेतकरी ड्रोन फवारणी सेवा वारंवार वापरत आहेत. ड्रोन फवारणी तंत्रज्ञानाची स्वीकृत देशभरात वाढत आहे.

    शेतकरी ड्रोन तंत्रज्ञानाबद्दल उत्साहित आणि भविष्यवादी आहेत. शेतकऱ्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे समाधान मिळते आणि आम्हाला आनंद होतो.

    ॲग्रीकल्चर ड्रोन खरेदी करण्यासाठी अधिक माहितीसाठी संपर्क -

    Authorized Distributor In Maharashtra
    PARAS AEROSPACE PVT LTD HIND ID SOLUTION:
    +91 8485809114